पोलीस भरतीत यश मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 15, 2026

पोलीस भरतीत यश मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान

 पोलीस भरतीत यश मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयातील माजी विद्यार्थी निकिता सोडमिसे, मिथाली सोडमिसे, महादेव लांडगे, योगेश माळी, अभिजित होळ या पाच महाविद्यालयाचे माजी   विद्यार्थ्यां यांची पुणे पोलीस म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या  अध्यक्षा  पदमजादेवी मोहिते पाटील, संचालक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, उर्वशीराजे मोहिते पाटील, प्राचार्य डॉ. बाळासाहेब निकम, प्रा.जगदीशचंद्र मुळीक, प्रा.उत्तम सावंत, प्रा.दत्तात्रय शहाणे, प्रा. हनुमंत वाघमोडे, डॉ. संभाजी बनसोडे, प्रा.पै.नारायण माने व महाविद्यालयाचा सर्व स्टाफ यांच्या वतीने पोलीस भरतीत यश मिळवलेल्या वरील विद्यार्थ्यांचा फेटा शाल हार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. अशाप्रकारे होणारा गौरव विद्यार्थ्याचे मनोबल वाढवण्यासाठी मोलाची भूमिका बजावत असल्याचे मत यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब निकम यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या पुढील यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages