मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे द्वार अद्याप खुले; १६ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे द्वार अद्याप खुले; १६ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज

मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे द्वार अद्याप खुले; १६ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज


 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतर्गत येणाऱ्या ८८ शिक्षणक्रमांच्या जानेवारी सत्रासाठी ऑनलाईन प्रवेशाची मुदत आता दि. १६ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.

यापूर्वी प्रवेशाची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी होती. मात्र, तांत्रिक अडचणी किंवा माहितीअभावी प्रवेश घेता न आलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

जानेवारी २०२६ सत्रासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची द्वितीय वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून, या मुदतवाढीचा लाभ नवीन व जुन्या दोन्ही विद्यार्थ्यांना होणार आहे.

विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र जानेवारीपासून सुरू झाले असून, विविध पदवी व पदविका अभ्यासक्रमांसाठी पूर्णपणे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन १६ मार्चपूर्वी अर्ज करावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

 चौकट 

सोलापूर जिल्ह्यात ४५ अभ्यासक्रम केंद्रे; विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

सोलापूर जिल्ह्यात विद्यापीठाचे शैक्षणिक जाळे विस्तारले असून, एकूण ४५ अभ्यासक्रम केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या केंद्रावरून ८८ विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन आपले शिक्षण पूर्ण करण्याची संधी साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages