जन्म–मृत्यू नोंदणी २१ दिवसांत बंधनकारक; उशीर केल्यास दंड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार जन्म व मृत्यूची नोंद घटना घडल्यानंतर २१ दिवसांच्या आत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामपंचायत तसेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत स्तरावर ही नोंदणी केली जाते.
महापालिकेने सरकारी व खासगी रुग्णालयांना नवजात बालकांची माहिती वेळेत ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत. जन्म नोंदणीसाठी आई-वडिलांचे आधारकार्ड सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
उशिरा नोंदणीचा फटका
जन्म किंवा मृत्यूची नोंद २१ दिवसांनंतर केल्यास संबंधितांना दंड भरावा लागतो. तसेच प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रथमवर्ग दंडाधिकारी किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. वेळेत नोंदणी केल्यास दोन्ही प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने सहज उपलब्ध होतात.
No comments:
Post a Comment