वाशिंबेमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने व मोबाईल,मोटारसायकलची चोरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 27, 2026

वाशिंबेमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने व मोबाईल,मोटारसायकलची चोरी

 वाशिंबेमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने व मोबाईल,मोटारसायकलची चोरी

वाशिंबे (कटूसत्य वृत्त):-२७ मे च्या मध्यरात्री १.३० वाजता घरासमोर झोपलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेत व पाच जणांचे मोबाईल फोन चोरीची घटना घडली.प्रत्यक्षदर्शी सांगितले की चोर ५ ते ६ जण आहे .तोंडाला मास्क लावून चोरी करत आहेत.या घटनेने गावामधील तरुणांनी मध्यरात्री एकमेकांना फोन करून व ग्रामसुरक्षा यंत्रणेने संपुर्ण गावामध्ये कॉल करत नागरिकांना सतर्क केले. दोन दिवसांपूर्वी गावातील कानडे यांची मोटारसायकल चोरी गेली आहे.मागील महिन्यात नांगी चारी येथे नदीवरील विद्युत,केबल व पंपामधील ताब्यांच्या ताराची चोरी झाली होती.परिसरात नागरिकांमध्ये अशा घटनांबाबत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाशिंबेचे पोलिस पाटील: संजय पाटील यांनी घटनेची सविस्तर माहिती पीएसआय बनकर,बिट अंमलदार पवार,आर्किले याना संपर्क करत करमाळा पोलिस स्टेशनला दिली आहे. ही चोरीची मालिका थांबवण्यासाठी पोलिसांनी गस्त देत लवकरच आरोपींना अटक करावी,अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages