पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.1500 विद्यार्थ्यांचा सहभाग योगासनांची प्रात्यक्षिक सादर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 21, 2026

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.1500 विद्यार्थ्यांचा सहभाग योगासनांची प्रात्यक्षिक सादर

 पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.1500 विद्यार्थ्यांचा सहभाग योगासनांची प्रात्यक्षिक सादर






  सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दिनांक 21 जून  पी.एस.व्ही  ट्रस्ट श्राविका संस्था  श्री सिद्धिविनायक योग व प्राणायाम पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन श्राविका संस्थेच्या प्रांगणात उत्साहात  साजरा  झाला. या प्रसंगी सिद्धिविनायक योग समितीच्या योग प्रशिक्षिका वसुंधरा पवार, चंद्रकांत पवार, स्नेहा मेहता,  उषा क्षीरसागर, रघुनाथ क्षीरसागर श्राविका संस्थेच्या वरिष्ठ मार्गदर्शिका दीप्ती शहा, मुख्याध्यापिका अश्विनी पंडित, मुख्याध्यापिका स्वाती कांबळे, मुख्याध्यापिका राखी देशमाने, प्राचार्य विलास लेंगरे, उपमुख्याध्यापिका माधवी खोत,पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ,जयेश शिरढोणे, अर्चना अक्कलकोटे,  कल्पना राणावत काटकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत  

दीप प्रज्वलन करून प्रतिमा पुजन करण्यात आले.

या आंतरराष्ट्रीय योग प्रात्यक्षिक मध्ये 1500  विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

 क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे यांनी प्रारंभी विद्यार्थ्यांना योग दिनाच्या इतिहास व योग दिनाचे महत्त्व सांगून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या भारतीय योगाच्या सेवकांच्या जगातील अनेक देशाने स्वीकारला योगामुळे शारीरिक मानसिक बौद्धिक यांचि विकास होतो योग व प्राणायाममुळे मानसिक शांतता ध्यान आणि योगाच्या सरावाने ताण तणाव कमी होतो नियमित योगामुळे आपली पचनक्रिया सुरळीत चालते, अनेक आजारापासून दूर राहण्यास मदत होते. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे असे महत्त्व सांगितले. 

याप्रसंगी विद्यार्थ्यांना वसुंधरा पवार, चंद्रकांत पवार यांनी योगासनाच्या प्रात्यक्षिकाद्वारे पूरक व्यायाम त्रिकोणासान,ताडासन, वृक्षासन, चक्रासन, प्राणायाम, ध्यान, भामरी प्राणायाम, अनुलोम-विलोम, कपालभाती, आदी प्रत्येक आसनाचे महत्त्व कसे करावे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व करून घेतले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप कस्तुरे,यांनी केले तर पाहुण्यांच्या परिचय, राजश्री आगरखेड तर आभार प्रदर्शन माणिकशेटे यांनी मानले.

हे आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वी करण्यासाठी रोहन घाडगे, अजित पाटील, कल्याण अप्पा हायगोंडे, सोमनाथ मगर, अभिनंदन उपाध्ये, अभिजित पाटील,  कविताउपाध्ये, प्रियंका जैन, अनंत बेळ्ळे शिंदे, जाधव, , विश्वजीत मोहोळे, मनोज शहापुरे, योगेश गिरी, यांनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages