स्वामी विवेकानंद प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 21, 2026

स्वामी विवेकानंद प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा

स्वामी विवेकानंद प्रशालेत जागतिक  योग दिन उत्साहात साजरा 




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  नॅब संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी सोलापूर येथे आज जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ.राजेश्वरी कोंगारी ( भारतीय योग संस्था रोहिणी दिल्ली), सौ. संगीता गुंडू ( भारतीय योगा संस्था रोहिणी दिल्ली ) व प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. हणमंत नारायणकर सर उपस्थित होते.  दरवर्षी २१ जून रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. योगासनांमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. हा दिवस ' एक पृथ्वी, एक स्वास्थ्य' (One Earth, One Health) या मुख्य संकल्पनेवर आधारित आहे.योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. भारताकडून  २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (UN) महासभेत २१ जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता, ज्याला जगभरातील देशांनी मान्यता दिली. २१ जून रोजी उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो, ज्यामध्ये सूर्योदय लवकर होतो आणि सूर्यास्त उशीरा होतो. नियमित योगासने केल्याने शरीराचा लवचिकपणा वाढतो आणि स्नायू मजबूत होतात. ध्यानामुळे (Meditation) ताणतणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक सुभाष माने यांनी केले तर आभार खंडू शिंदे यांनी मानले. प्रशालेतील सहशिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर योगासनाची विविध प्रकार केले व योगासनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी प्रशालेतील सहशिक्षक मच्छिंद्र सपताळे, संजय राठोड, गणपती कोळी, उज्वला हिंगमिरे, आदी शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages