आ रोहित पवार यांच्या जीवाला धोका? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 21, 2026

आ रोहित पवार यांच्या जीवाला धोका?

 आ रोहित पवार यांच्या जीवाला धोका?




तात्काळ Z+ सुरक्षा देण्याची राज्य सरकारकडे मागणी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त करत त्यांना तातडीने Z+ सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) व युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने करण्यात आली आहे.
अजितदादा पवार यांच्या कथित विमान दुर्घटनेबाबत राज्यातील जनतेच्या मनात निर्माण झालेल्या शंकांवर आमदार रोहित पवार सातत्याने पत्रकार परिषदांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत आहेत. ही दुर्घटना नसून सुनियोजित कट असू शकतो, असा संशय व्यक्त करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. जर या प्रकरणात प्रभावशाली घटक सहभागी असतील, तर त्यांच्याकडून आमदार पवार यांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
यासंदर्भात सोलापुरात निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी सादर करण्यात आली. हा अत्यंत संवेदनशील विषय असून सुरक्षा पुरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत. तुमचे निवेदन तात्काळ शासनाकडे पाठवण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
📌 मागणीचे प्रमुख मुद्दे :
 • संबंधित विमान दुर्घटनेची आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून सखोल चौकशी करण्यात यावी.
 • दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.
 • नवी दिल्लीस्थित खासगी चार्टर कंपनी VSR Ventures वर तात्काळ बंदी घालण्यात यावी.
 • राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रोहित पवार यांना तात्काळ Z+ सुरक्षा द्यावी.
“लोकशाहीत लोकप्रतिनिधींना मोकळेपणाने मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जर सत्य मांडल्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असेल, तर ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, युवा सेनेचे उपसचिव रणजीत बागल, डॉ. योगेश रणदिवे, प्रशांत गायकवाड, मुसा आत्तार, अजित पात्रे, अमित मोतेवार, मिलिंद गोरे, मोहित निकम, अमरसिंह खांडेकर, युनुस अत्तार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages