छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करून रयतेचे राजे झाले- प्रा.एम.बी.सावंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 21, 2026

छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करून रयतेचे राजे झाले- प्रा.एम.बी.सावंत

 छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करून रयतेचे राजे झाले- प्रा.एम.बी.सावंत




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- शिवाजी महाराजांनी चांगले राज्य सर्व धर्मांचा आदर आणि लोकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण करून स्वराज्याची स्थापना केली व खऱ्या अर्थाने महाराज रयतेचे राजे झाले असे प्रतिपादन प्रमुख व्याख्याते मा.प्रा. एम.बी.सावंत यांनी केले.
ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयात घेण्यात आलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ.बी.टी. निकम तसेच कार्यक्रम अधिकारी ,प्रा.जगदीशचंद्र मुळीक,प्रा.उत्तम सावंत,तसेच प्रा.श्रीकांत पवार,प्रा.नितीन देशपांडे, प्रा.राजेंद्र साठे,प्रा.पुष्पा सस्ते, ग्रंथपाल प्रा.दिलीप शिंदे हे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नातेपुते शहरात घोषणाबाजी करत पदयात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर ऑनलाइन प्रश्नावली सोडवून घेण्यात आली. तसेच महाविद्यालयातील साक्षी झेंडे व मनीषा येडगे यांनी शिवराया विषयी आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.उत्तम सावंत यांनी केले,सूत्रसंचालन प्रा.पुष्पा सस्ते व आभार प्रा.श्रीकांत पवार यांनी मानले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages