राजराजेश्वरी प्राथमिक शाळेचे राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेत यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 21, 2026

राजराजेश्वरी प्राथमिक शाळेचे राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेत यश

 राजराजेश्वरी प्राथमिक शाळेचे राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेत यश




 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा हिंदी  परीक्षेत विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक शाळेतील १०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हिंदी सुलेखन परीक्षेत पाचवीच्या ४८  विद्यार्थ्यांमधून चार विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीत तर ४४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. हिंदी प्राथमिक परीक्षेत सहावीच्या २३ विद्यार्थ्यांमधून १६ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता श्रेणीत तर सात विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.हिंदी प्रारंभिक परीक्षेत सातवीच्या ३५ विद्यार्थ्यांमधून ३३ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यतेत तर दोन  विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.सहशिक्षक  बजरंग शिरसट यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, ज्येष्ठ शिक्षिका वैशाली गुजर,बजरंग शिरसट यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages