आवताडे शुगरने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या : अॅड. राहुल नार्वेकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 24, 2026

आवताडे शुगरने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या : अॅड. राहुल नार्वेकर

 आवताडे शुगरने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या : अॅड. राहुल नार्वेकर

पंढरपूर (कटूसत्य वृत्त) : आवताडे शुगरने स्थानिक उद्योगांना बळ देण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या आहेत. ग्रामीण भागात उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र विधानसभेचे सभापती अॅड. राहुल नार्वेकर यांनी काढले.
मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर अॅन्ड डिस्टीलरीज प्रा. लि. येथे कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या बीज वितरणाचा शुभारंभ अॅड. नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
या प्रकल्पामुळे ऊर्जानिर्मिती, पर्यायी इंधन आणि शेतीपूरक उद्योगांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. उपलब्ध संसाधनांचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला यामुळे गती मिळेल, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला.
मंगळवेढ्यासारख्या ग्रामीण भागात आधुनिक आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी ही काळाची गरज आहे. अशा प्रकल्पांमुळे स्थानिक उद्योगांना बळ मिळण्याबरोबरच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच शेतकरी, उद्योग आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार समाधान आवताडे, श्री संत दामाजी मंदिर संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे, नगरसेवक सोमनाथ आवताडे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, उपनगराध्यक्ष प्रा. वेताळा भगत, प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, नगरसेवक प्रसाद कळसे, दिलीप गुरव, सभापती दीपाली ताड, अंबादास कुलकर्णी, विजयसिंह देशमुख, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, सरव्यवस्थापक सुधीर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages