मुली आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नवनाथ वाघमारेवर गुन्हा दाखल करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 19, 2026

मुली आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नवनाथ वाघमारेवर गुन्हा दाखल करा

 मुली आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नवनाथ वाघमारेवर गुन्हा दाखल करा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष मीनल ताई दास यांच्या नेतृत्वात चार हुतात्मा पुतळा, सोलापूर याठिकाणी निषेध करण्यात आला. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील मुलींबद्दल आणि महिलांबद्दल केलेले विधान हे अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि सामाजिक शांतता बिघडवणारे आहे. कोणत्याही समाजातील महिलांचा आणि मुलींचा अशा प्रकारे अवमान करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महिलांचा आणि मुलींचा आदर केला जात होता आज त्यांच्याच लेकीबाळींना जर अशा प्रकारे अपमानित करण्यात येत असेल तर हे आम्ही खपवून घेणार नाहीत.यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी यासाठी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय देशमुख साहेब यांना निवेदन देण्यात आले. त्याच्या बेताल बोलण्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाली असून महिलांच्या लज्जेस धक्का पोहोचला आहे.धार्मिक किंवा जातीय भावना जाणीवपूर्वक दुखावणे. दोन वेगवेगळ्या सामाजिक घटकांमध्ये किंवा जातींमध्ये द्वेष आणि तेढ निर्माण करणे. शब्दांद्वारे  महिलेच्या लज्जेचा आणि आदराचा अवमान करणे. शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे किंवा चिथावणी देणे. असे कृत्य त्याच्याकडून करण्यात आले आहे म्हणून जेणेकरून इथून पुढे कोणीही महिलांबद्दल आणि मुलीबद्दल अपशब्द वापरणार नाहीत यासाठी त्याच्या प्रतिमेच्या बॅनरला जोडे मारून निषेध आंदोलन करून अटक करण्यासाठी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मीनलताई दास, जिल्हा उपाध्यक्ष सरोजिनी माकाई, जिल्हा कार्याध्यक्ष जयश्री हिरेमठ, जिल्हा संघटक अनिता वाघमारे, शहराध्यक्ष जयश्री रानसरजे, शहर उत्तर उपाध्यक्ष सुरेखा लंगरे, शहर संघटक अरुणा जाधव,शहर उत्तर उपाध्यक्ष अन्नपूर्णा स्वामी, शहर उत्तर कार्याध्यक्ष विद्या दीक्षित, प्रभाग क्रमांक 24 अध्यक्ष सुरेखा येवले व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages