आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बुधवारी वर्धापन दिन समारंभ
नाशिक(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापन दिन समारंभ बुधवार, दि. १० जून, २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.
विद्यापीठाचे मा. कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे (अतिरिक्त कार्यभार), यांच्या अध्यक्षेतेखाली तसेच प्रमुख अतिथी म्हणून पद् मश्री पुरस्कार प्राप्त मा. श्री. चैत्राम पवार तसेच सन्माननीय अतिथी म्हणून पद् मश्री पुरस्कार प्राप्त मा. श्री. पोपटराव पवार, नाशिकचे विभागीय आयुक्त मा. डॉ. प्रविण गेडाम, नाशिकचे जिल्हाधिकारी मा. श्री. आयुष प्रसाद उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी दिली. या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ व विद्यापीठ विविध प्राधिकरणाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.
यावेळी संलग्नित महाविद्यालयातील ३७ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात येणार आहेत तसेच विद्यापीठातर्फे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार, उत्कृष्ट खेळाडू विद्यार्थी पुरस्कार, राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार, सांस्कृतिक पुरस्कार आणि विशेष सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
याप्रसंगी बक्षीस वितरण कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सन २०२५-२०२६ मधील उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार इगतपूरी येथील एस.एम.बी.टी.आयुर्वेर्द महाविद्यालयाचे पियुष निंबाळकर, पुणे येथील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे अनिकेत करांडे, मुंबई येथील श्रीमती सुनंदा प्रविण गंभीरचंद परिचर्या महाविद्यालयाच्या प्रांजली मोजाड, सांगली येथील श्री.आण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयाच्या नेहा तांबिले, नाशिक येथील मोतीवाला होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्तिकी आहिरे, अमरावती येथील श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रतिक्षा शिंदे यांना देण्यात येणार आहे. तसेच पुणे येथील आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्राचे डॉ. राजेश म्हस्के व मुंबई येथील श्रीमती सुनंदा प्रविण गंभीरचंद परिचर्या महाविद्यालयाच्या प्रो.डेल्फिना गुरव यांना देण्यात येणार आहे.
याप्रसंगी दि.२६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिननिमित्त मुंबई येथे पथसंचलन कार्यक्रमात विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणारे नाशिक येथील मोतीवाला होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे अभय बेंद्रे, बुलढाणा येथील स्व. सुनिल रामसिंह चुनावाले आयुर्वेद महाविद्यालयाच्या अश्विनी माळी, मुंबई येथील आय.एन.एच.एस. अश्विनी परिचर्या महाविद्यालयाच्या मनिषा कानवर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
याप्रसंगी राज्यस्तरीय आव्हान-२०२६ शिबिरात विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व व ’राज्यस्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका पुरस्कार’ प्राप्त बुलढाणा येथील स्व. सुनिल रामसिंह चुनावाले आयुर्वेद महाविद्यालयाचे आर्या कदम यांना यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ’उत्कर्ष’ सामाजिक व सांस्कृतिक राज्यस्तरीय महोत्सवात विद्यापीठाचे संघपमुख श्रीरामपूर येथील शरदचंद्रजी पवार होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. बापुसाहेब हरिचंश्द्रे, राहुरी येथील एस.व्ही.एन.एच.टी.चे. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रथम क्रमांक प्राप्त संकेत शिंदे, संगमनेर येथील वामनराव इथापे होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाचे द्वितीय क्रमांक प्राप्त शुभम जोंधळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
उत्कृष्ट खेळाडू विद्यार्थी पुरस्कार अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अमोल माळोदे यांना देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार पालघर येथील वेदांता इन्स्टिटयूट ऑफ वैद्यकीय महाविद्यालयाच्या झेनीया मिस्त्री, कोल्हापूर येथील हौशाबाई होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या अक्षता होनोले, मंबई येथील अश्विनी आय.एन.एच.एस. नर्सिंग महाविद्यालयाच्या शिबु रिया यांना देण्यात येणार आहे.
उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार नाशिक येथील एम.पी.जी.आय.वैद्यकीय संस्थाचे डॉ. गोपल शिंदे, के.बी.एच. दंत महाविद्यालयाचे डॉ. स्वप्ना महाले, मुंबई येथील आर.ऐ.पोतदार आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. राजेश कोलारकर, पालघर येथील डॉ. एम.एल.ढवळे मेमोरिअल होमिओपॅथीक इन्स्टिट्यूटचे डॉ. बिपीन जैन, पुणे येथील श्रीमती बकुळ तांबट नर्सिंग महाविद्यालयाच्या डॉ. मिना गणपती यांना देण्यात येणार आहे.
याप्रसंगी डॉ. अविनाश सुपे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ’इंद्रधनुष्य-२०२६’ मध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणारे अहिल्यानगर येथील एस.व्ही.एन.एच.टी.चे आयुर्वेद महाविद्यालयाचे संकेत शिंदे, मुंबई येथील श्रीमती सुनंदा प्रविण गंभीरचंद कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या दर्शना शितोळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ ’आविष्कार’ संशोधन महोत्सवामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणारे छत्रपती संभाजीनगर येथील सी.एस.एम.एस.एस दंत महाविद्यालयाचे डॉ. रोशन अमरलाल यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
विद्यापीठाचा २८ वा वर्धापन दिन समारंभाचे विद्यापीठ आवारातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीच्या धन्वंतरी सभागृहात सकाळी ११.०० वाजता आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. याप्रसंगी दुसऱ्या सत्रात विद्यार्थी व कर्मचारी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी विद्यापीठाच्या वर्धापन दिन समारंभास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment