Hot Posts

6/recent/ticker-posts

साेलापूर जिल्ह्यातील २९३ पाझर तलावांचे काम पूर्ण

 साेलापूर जिल्ह्यातील २९३ पाझर तलावांचे काम पूर्ण




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात मागील वर्षभरात ० ते १००, १०१ ते २५० व २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या ५७५ पाझर तलावांपैकी २९३ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. यातून ७८ हजार ७७४ सहस्त्र घनमीटर (सघमी) पाणीसाठ्यात वाढ झाली असून १७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

उर्वरित २८२ प्रकल्पांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असून त्यातून १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पांवर आतापर्यंत ७ कोटी ४९ लाख रुपये खर्च झाला आहे.

शासन योजनेतून ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमता असलेले १५ तर १०१ ते २५० हेक्टरपर्यंतचे ३४ तलाव पूर्ण झाले आहेत. यातून ६ हजार ११६ हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ होणार आहे. या प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे २५ हजार ७८२ सघमी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमता असलेले १६ तर २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमता असलेले ४३ तलावांचे काम प्रगतिपथावर आहे. यातून १३०९ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार आहे.

१७ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ८२५६ सघमी पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. महामंडळ योजनेतून ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमता असलेले १७२ प्रकल्प तर १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमता असलेले ४३, असे एकूण २१५ प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे ४६ हजार ६९ सघमी पाणीसाठ्यात वाढ झाली असून ९ हजार २७७ हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ होणार आहे. ० ते १०० हेक्टर क्षमता असलेले २०५, १०१ ते २५० क्षमतेचे ३४ तर २५१ ते ६०० क्षमतेच्या एका प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. हे २४० प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १३ हजार २५ हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ होणार असून ६५ हजार ३०१ सघमी पाणीसाठा वाढणार आहे.

नियोजनमधून निधी मिळालेले २९ प्रकल्प पूर्ण

नियोजन समितीमधून ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमता असलेले २५ प्रकल्प तर १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमता असलेले ४, असे एकूण २९ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यातून पाणीसाठ्यात ६ हजार ९२३ सघमी वाढ झाली आहे. यामुळे १ हजार ६१८ हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या २३ तर १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या २, अशा एकूण २५ प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. यामुळे १०७६ हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ होणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments