Hot Posts

6/recent/ticker-posts

वैभव हत्तुरे यांना युवांसह महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा

 वैभव हत्तुरे यांना युवांसह महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा



सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- प्रभाग क्रमांक २५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अधिकृत उमेदवार वैभव हत्तुरे यांना मिळणारा जनपाठिंबा दिवसेंदिवस वाढत असून, युवक व महिला वर्गाचा त्यांना विशेष पाठिंबा लाभत आहे. प्रभागातील सुशिक्षित व कष्टकरी युवकांनी यंदा परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार केला असून, अभ्यासू व कार्यक्षम नेतृत्व म्हणून वैभव हत्तुरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
तरुणांच्या हाताला काम मिळावे, तसेच प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे मत युवकांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर वैभव हत्तुरे हेच प्रभाग २५ साठी योग्य उमेदवार असल्याचे मतदारांमधून बोलले जात आहे.
महिला वर्गाकडूनही वैभव हत्तुरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला असून, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या माध्यमातून शहरासह प्रभागाचा कायापालट करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रचारावेळी प्रा. वैजिनाथ हत्तुरे, संजय हत्तुरे, विनायक हत्तुरे, रितेश हत्तुरे, वीरपाक्ष चिवरे, काशीनाथ बिराजदार, प्रसाद कांबळे, गौरीशंकर पनशेट्टी, रवि पारशेट्टी, सचिन पाटील, स्वप्नील कोटाणे, चेतन हिप्परगे, ऋषिकेष ताटे, राहुल जगताप व शुभम हसनापुरे आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments