बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक विजय सोनकुसरे सेवा निवृत्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील बँकिंग क्षेत्रात अत्यंत नावाजलेले बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक व आंचलिक केन्द्रियकृत परिचालन विभाग,चे मुख्य प्रबंधक विजय कृष्णराव सोनकुसरे हे सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त तुमचा सत्कार ठेवण्यात आलेला होता.
अशोक चौक येथील बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर चंद्रशेखर मंत्री आणि सहाय्यक महाप्रबंधक गौतम कुमार होते.
चंद्रशेखर मंत्री बोलताना पुढे म्हणाले की सोनकुसरे हे शिस्त प्रिय आणि जबाबदारीने काम करणारे व्यक्तिमत्व असून त्यांनी बँकेच्या कोणत्याही जबाबदाऱ्या अगदी लीलया पेलेल्या आहेत.
त्यांचे व्यक्तिमत्व हे प्रेरणा घेण्यासारखे आहे असे गौरव उद्गार - झोनल मॅनेजर चंद्रशेखर मंत्री यांनी काढले. यावेळी बाबाजी काटकर, र जाधव, बाला राजू राम बाबू , श्रीराम करडकर आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे सेवा निवृत्ती चे कार्यक्रम संपन्न झाले.
कार्यक्रमाची प्रस्तावना गौतम कुमार यांनी केली तर सूत्रसंचालन रोहित कांबळे यांनी केले तर आभार गणेश जाधव यांनी मानले. काही सदस्यांनी आपली मनोगत व्यक्त केली तर प्रामुख्याने गौतम कुमार सर म्हणाले की विजय सोनकुसरे मोठ्या हिंमतीने 39 वर्षे सेवा दिली आहे. आणि त्यांच्या उर्वरित आयुष्याला शुभेच्छा दिल्या त्यांनी निरोगी राहून आणि आपले छंद जोपासावेत अशा आशयाच्या शुभेच्छा दिल्या.
.png)
No comments:
Post a Comment