Hot Posts

6/recent/ticker-posts

सावित्रीबाई फुले व पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

 सावित्रीबाई फुले व पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम






अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- देशभरातील मुलींच्या शिक्षणाची पायाभरणी करून शिक्षणाची द्वारे  सर्व जाती धर्मातील मुलींना प्रतिकूल स्थितीत खुली करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण म्हणून तसेच सीमावर्ती भागातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महान कार्य स्व. पंचप्पा कल्याणशेट्टी यांनी केले ही भावना मनोभावे उद्दीपित करून कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी खास त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित केला.

इतिहास व राज्यशास्त्र अभ्यास मंडळातील विद्यार्थिनींनी एकत्र येऊन सावित्रीबाई फुले व पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी प्रा डॉ बाळासाहेब पाटील, प्रा मधुबाला लोणारी, प्रा विद्या बिराजदार, प्रा ओमकार घिवारे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन प्रा सौरभ भस्मे यांनी केले प्रास्ताविक शकुंतला कोरे यांनी केले तर आभार पायल कांबळे यांनी मानले.

या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, जूनियर विभागप्रमुख पुनम कोकळगी, सेमी इंग्लिश विभाग प्रमुख रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा  भरमशेट्टी यांनी कौतुक केले.
Reactions

Post a Comment

0 Comments