नाळेवस्ती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- नाळेवस्ती जि. प. प्राथमिक शाळा नाळेवस्ती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्निल नाळे, रणजित नाळे, नागनाथ नाळे, सिद्धेश्वर गणगे तसेच बहुसंख्य मातापालक उपस्थित होते.
मुख्याध्यापक सौ. राजश्री कुबेर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट व सामाजिक-शैक्षणिक कार्य याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नागनाथ नाळे व राजाबाई खोटे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या वतीने विद्यार्थी व मातापालकांना समोसा व जिलेबीचा अल्पोपाहार देण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका सुमन कुटे यांनी केले.

0 Comments