सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती ब्रिगेड च्या वतीने जुळे सोलापूर भागातील संपर्क कार्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस बालिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या देशातील महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी विशेष करून महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी दीर्घ लढा दिला होता असे मनोगत छत्रपती ब्रिगेड चे संस्थापक श्याम कदम यांनी व्यक्त केले.
यावेळी छत्रपती ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी शहर कार्याध्यक्ष सोनाली सगर शहर उपाध्यक्ष सुमन बनसोडे अंबादास रेडे वसंत गुणगे संजय घोडके विश्वनाथ आमाने प्रवीण लक्शेट्टी मल्लिनाथ मातनाळे संतोष कोळी आदी उपस्थित होते.
.png)
0 Comments