पुण्यात एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026 चे भव्य आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 28, 2026

पुण्यात एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026 चे भव्य आयोजन

 उद्योग, नवकल्पना आणि संधींचे MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026 लवकरच सर्वांसाठी खुले.. 

पुण्यात एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026 चे भव्य आयोजन



पुणे (कटूसत्य वृत्त):-    मराठा उद्योजक संघटना (मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन – एमईए) यांच्या वतीने एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026 चे भव्य आयोजन करण्यात येत आहे. भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक प्रदर्शनांपैकी एक असे हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन दि. 27, 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी ॲग्रीकल्चरल ग्राउंड, पुणे येथे भरत असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता,  मा.ना.श्री मुरलीधर मोहोळ

(केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री व  सहकार राज्यमंत्री) यांच्या शुभहस्ते आणि मा.ना.श्री.चंद्रशेखर बावनकुळे( महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.  


या प्रदर्शनाच्या निमित्ताने विशेष बाब म्हणजे यामध्ये २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ६ यावेळेत राज्याचे उद्योगमंत्री ना. डॉ उदय सामंत यांच्या उपस्थितीत इंडस्ट्रीयल मिटचे आयोजन केलेले आहे .. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संधी कळू शकणार आहेत.


 तसेच या भव्य दिव्य प्रदर्शनात ५५० पेक्षा अधिक बिझनेसेस एकाच छताखाली येत आहेत. रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, एफएमसीजी, अ‍ॅग्रो-टेक, लाईफस्टाईल, शिक्षण, हॉस्पिटॅलिटी, सेवा क्षेत्र, इम्पोर्ट-एक्स्पोर्ट, ऑटोमोबाईल, हेल्थ अँड वेलनेस, बँकिंग व फायनान्स या क्षेत्रातील 500 हून अधिक स्टॉल असतील. देश-विदेशातील मराठा उद्योजक, व्यावसायिक, उद्योगपती आणि स्टार्टअप्स यात उत्साहाने सामील होत आहेत. 

व्यवसाय, गुंतवणूक, नावीन्यपूर्ण कल्पना आणि सहकार्य यातील जागतिक दर्जाच्या संधी अनुभवता येणार आहेत. सध्या व्यवसायात असलेल्या आणि नव्याने व्यवसायात येऊ पाहणाऱ्यांना नामाविध गोष्टींची देवाणघेवाण करण्याची उत्तम संधी यानिमित्ताने मिळणार आहे.


म्हणून सर्व पुणेकराना आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन करतो आहोत. प्रदर्शन व्यावसायिकांसाठी, उद्योजकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, कुटुंबांसाठी खुले आहे. प्रवेश मोफत आहे तेव्हा कुटुंबीय, मित्रमंडळी, स्नेहीजनांना घेऊन मोठ्या संख्येने या. उद्योजकांच्या नवनवीन कल्पना, उत्पादने, सेवा अनुभवा. मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आनंद घ्या. एक्स्पो बघून झाल्यावर मल्टी-क्युझिन फूड कोर्ट मध्ये चवदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या.


एमईए ही संस्था १२ वर्षांहून अधिक काळ मराठा उद्योजकांच्या भरभराटीसाठी कार्यरत आहे. 'स्वयंपूर्ण, जागतिक स्पर्धेत यशस्वी होणारा मराठा उद्योजकांचा समाज घडवणे', हे संस्थेचे ध्येय आहे. एमईए आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्स्पो 2026 हा एकजूट, विकास आणि एकात्मतेचा उत्सव आहे. उद्योजक, गुंतवणूकदार व उद्योगप्रेमींसह सर्वांनी या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला उपस्थित राहावे, असे आयोजकांतर्फे पुन्हा एकदा खास आवाहन.


अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री विक्रम गायकवाड यांनी खास पत्रकार परिषद घेऊन विस्ताराने सांगितली. या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष प्रमोद साठे सचिव राजेश कुराडे ,खजिनदार सई बहिरट पाटील, माजी अध्यक्ष अरुण आप्पा निम्हण तसेच सायली काळे, आश्रम काळे, तेजस चरवड, महेश घोरपडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages