सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला१०.०२ कोटी नफा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 28, 2026

सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला१०.०२ कोटी नफा

 सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला१०.०२ कोटी नफा

वार्षिक सभेत शिवाजी पाटील यांची माहिती: सभासदांना १०टक्के लाभांश.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ८६ वी वार्षिक साधारण सभा रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता वृंदावनम. लाॅन्स,एम आय जामगोंडी फार्म,जुळे सोलापूर येथे  संस्थेचे अध्यक्ष शिवाजी महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
 अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये संस्थेस सन २०२५-२६ सालाचा नफा १०कोटी ०२ लाख ८१ हजार इतका विक्रमी झाला,तसेच
संस्थेकडे अहवाल साल अखेर ठेवी २३५कोटी ७४ लाख,भाग भांडवल ५९ कोटी ४५ लाख,गंगाजळी १४ कोटी ३० लाख असे जमा असून संस्थेच्या १३ शाखा आहेत. प्रत्येक शाखेला संस्थेच्या अद्यावत इमारती असून स्थावर जंगम मालमत्तेच्या रूपाने आज अखेर ५ कोटी ४२ लाख रक्कमेची संस्थेची मालमत्ता आहे. तर ३१ मार्च २०२६अखेर एन.पी.ए.(बुडीत कर्ज) साठी र.रू.२ कोटी ८१ लाख  तरतूद संस्थेने केलेली असून कर्जाशी थकबाकीचे प्रमाण १.६९ टक्के आहे 
दिनांक ३१/३/२०२६ अखेर संस्थेचे ६४४० सभासद असून अहवाल सालात १५६ कोटी ९५ लाखाचे संस्थेने कर्ज वाटप केले असून १४० कोटी २९ लाखाचे कर्ज वसुल झाले आहे. येणे कर्ज बाकी ३४५ कोटी ०५ लाख  आहे.कर्जावर द.सा.द.शे. ९ रू.६० पैसे दरांने व्याज घेतले जाते तर ठेवीवर ८ रू४० पैसे.दरांने व्याज दिले जाते.संस्था नाममात्र १ रू.२० पैशावर कारभार करीत आहे दोन लाख रुपये संस्थेच्या कर्ज मर्यादेत वाढ करुन एकुण कर्ज मर्यादा रु ३५ लाख ७५ हजार रुपये झाली तसेच संस्थेच्या सभासदांना लाभांश   १०% सभेच्या मंजुरीनंतर लाभांश सभासदांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्याचे सांगितले,  सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी उपाध्यक्ष गुलाबराव आप्पासाहेब पाटील यांनी स्वागत केले व सभेचे विषय वाचन चिटणीस उमाकांत शिवाजी घाडगे यांनी केले त्यास सर्व सभासदांनी मंजुरी दिली आभार संचालक रामभाऊ यादव यांनी मानले.
    वार्षिक साधारण सभेनंतर  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले,  सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष उत्तमराव जमदाडे शिक्षक संघाचे नेते रावसाहेब जाधवर, बब्रुवान काशीद  सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष विरभद्र यादवाड शिक्षक संघाचे अध्यक्ष रणजीत थिटे, आदर्श समितीचे अध्यक्ष संजीव चाफाकारंडे , शुभहस्ते संस्थेकडून सामाजिक उपक्रम म्हणून जिल्हयातील गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून व उत्कृष्ट शाळांना आदर्श शाळा पुरस्कार म्हणून सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देउून गौरविण्यात  आले, तसेच फेब्रु/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी, इयत्ता बारावी (कला,वाणिज्य , विज्ञान) , इयत्ता ४थी ,५ वी शिष्यवृत्ती (शहरी व ग्रामिण) तसेच इयत्ता ७वी, ८ वी शिष्यवृत्ती (शहरी व ग्रामिण) परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून संस्थेस प्राप्त झालेल्या अर्जापैकी प्रत्येकी प्रथम ५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव वार्षिक साधारण सभेनंतर वरील मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवाजी महादेव पाटील यांनी यावेळी दिली.
    संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पाटील उपाध्यक्ष गुलाबराव पाटील,संचालक अशोक पोमाजी,अनिरूद्ध पवार, रामभाऊ यादव,रमेश घंटनेवरू,तानाजी गुंड,पाडुरंग नाईकनवरे, संजय चेळेकर,विठ्ठल काळे,रमेश शिंदे,हनुमंत सरडे,आबासाहेब जाधवर, राजेंद्र आवारे,संभाजी फुले,रविंद्र पाटील,शितल चव्हाण राणी व्हनमाने,तज्ञ संचालक सिध्देश्वर तिखटे,इक्कबाल नदाफ ,संस्थेचे चिटणीस उमाकांत शिवाजी घाडगे व हिशोबनीस सुधीर भोसले तसेच सुत्रसंचालन सतिश वाले व महिबुसाब सवार आणि अंजली रणदिवे यांनी केले व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages