खा. सुप्रिया सुळे यांची नागेश फाटे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 28, 2026

खा. सुप्रिया सुळे यांची नागेश फाटे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट

 खा. सुप्रिया सुळे यांची नागेश फाटे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट

पंढरपूर (कटूसत्य वृत्त) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या पंढरपूर येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खा. सुळे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
या भेटीदरम्यान खा. सुळे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षाची संघटनात्मक बांधणी, स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राशी संबंधित विषयांवर चर्चा केली. आगामी काळात पक्षाचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे यावेळी चर्चेतून अधोरेखित झाले.
यावेळी खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. राजू खरे, आ. नारायण आबा पाटील, जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष रवी पाटील, सक्षणा सलगर यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, शहराध्यक्ष दीपक वाडदेकर, सागर पडवळ, सुरज पेंडल, भास्कर गायकवाड, संजय पवार, गोरख नाना बागल, अरुण पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages