जिजाऊ ज्ञान मंदिर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 5, 2026

जिजाऊ ज्ञान मंदिर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती

 जिजाऊ ज्ञान मंदिर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती




कोंडी(कटूसत्य वृत्त):- जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ कोंडी संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलामध्ये महिला शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलाने करण्यात आली.
या कार्यक्रमाचा औचित्य साधून विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या जीवन कार्यावर आधारित सुंदर भाषणे, कविता ,आणि नाटिका सादर केल्या.
यामध्ये अंकिता हुंडेकरी, पूजा चव्हाण, आणि अक्षरा साठे यांनी ह्रदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या.

संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ आणि प्राचार्य सुषमा निळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापिका अर्चना औरादे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,  सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात मुलींसाठी शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची खऱ्या अर्थाने क्रांती घडवली त्यांच्या या कार्यामुळेच आजच्या महिलांना शिक्षणाचा हक्क आणि अधिकार मिळतोय.
परंतु आज मुलींनी न डगमगता स्वसंरक्षणासाठी आणि होणाऱ्या अत्याचारापासून वाचण्यासाठी रणरागिणी बनणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुख्याध्यापक वैभव मसलकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी दादासाहेब नीळ यांनी स्त्री स्त्री शिक्षणाचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
स्त्रीशक्तीची जाणीव समाजाला निर्माण झाली पाहिजे या विषयावर अनुजा बोराडे यांनी आपले विचार मांडले. एकंदरीत हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि प्रेरणा निर्माण करणारा ठरला.

कार्यक्रमासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विकास जाधव, मुख्याध्यापिका अर्चना आवरादे, मुख्याध्यापक वैभव मसलकर आणि दादासाहेब नीळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन महादेवी माने यांनी केले. तर आभार प्रदर्शन अनुजा बोराडे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages