शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
संस्थेचे चेअरमन नितीनराजे निंबाळकर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.
यावेळी अविनाश जाधव,उमेश मोहिते, गजूनाना शिंदे,शंकर क्षिरसागर,अधिराज्य क्षिरसागर,सचिव शुभम गोरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन नितीनराजे निंबाळकर म्हणाले,
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक,आणि स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत होत्या. त्यांचे कार्य भारतीय समाजाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली.
स्त्रीशिक्षण, दलित शिक्षण आणि विधवा पुनर्वसनासाठी आयुष्य समर्पित केले.अस्पृश्यता, जातिभेद, स्त्री-अन्याय विरुद्ध निर्भीडपणे लढा दिला.समाजातील उपेक्षितांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह, विधवा आश्रम अशी कार्ये त्यांनी केली असल्याचे चेअरमन नितीनराजे निंबाळकर म्हणाले.
.png)
0 Comments