Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज येथे भव्य लेझीम स्पर्धेचे आयोजन

 अकलूज येथे भव्य लेझीम स्पर्धेचे आयोजन



 
अकलूज (कटूसत्य वृत्त):- संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत भव्य लेझीम स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी दिली. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त विजय चौक अकलूज येथे विसाव्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ग्रामीण खेळ,व कलेचे जतन व संवर्धन करणारे जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळांने आजपर्यंत  ७० हजार पेक्षा अधिक लेझीम खेळाडू, प्रशिक्षक निर्माण केले आहेत. ग्रीनिज वर्ल्ड बुक मध्येही अकलूजच्या लेझीम खेळाची नोंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
        या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक ७ रोजी  मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील व नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील या मान्यवरांच्या शुभहस्ते होत असून, याचा बक्षीस वितरण समारंभ सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन व मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते पाटील, व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील या मान्यवरांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव संजय राऊत यांनी दिली. याकरिता प्राथमिक गट, ग्रामीण मुले व मुली गट व शहरी मुले व मुली गट असे स्वतंत्र पाच गट असून या स्पर्धेत ५८ संघानी नोंदनी केली आहे. प्रथम क्रमांकास रुपये  ५ हजार, द्वितीय क्रमांक ४ हजार, तृतीय क्रमांकास रुपये ३ हजार व सन्मान चिन्ह याच बरोबर उत्कृष्ट प्रशिक्षक, उत्कृष्ट हलगी वादक, उत्कृष्ट घुमके वादक, उत्कृष्ट सनई वादक यांना देखील स्वतंत्र बक्षीस देण्यात येणार आहेत.या स्पर्धा गुण पद्धतीने खेळवल्या जाणार असून प्रत्येक संघास सादरी करण्यासाठी दोन डाव दिले जाणार आहेत. मंडळाच्या वतीने प्रत्येक खेळाडूस मोफत भोजनही दिले जाणार असल्याचेही सचिव यांनी सांगितले. याकरता खालील क्रमांकावर संपर्क करण्याची आव्हाने मंडळाने केले आहे.
संजय राऊत ९८९०४३४२१०, ईलाही बागवान ९२७२३६५१३६,सुजित कांबळे ८४२११०११२१,बिभीषण जाधव ९८५००३९६०८, किरण सूर्यवंशी ९८९०७३९२३५, अमोल बनपट्टे ७०२०६५८८०४, ईलाही बागवान ९२७२३६५१३६
Reactions

Post a Comment

0 Comments