सुशीलकुमार शिंदे व खा. प्रणिती शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 30, 2026

सुशीलकुमार शिंदे व खा. प्रणिती शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

 सुशीलकुमार शिंदे व खा. प्रणिती शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. समाज व जनतेसाठी सदैव समर्पित असलेल्या अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून न येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात व राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांनी अंतिम दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले.

अजितदादा पवार हे दूरदर्शी, कणखर नेतृत्व व प्रशासकीय कामावर मजबूत पकड असलेले जनतेचे नेते होते. कामातील शिस्त, गुणवत्ता आणि विकासाची स्पष्ट दृष्टी ही त्यांची ओळख होती. त्यांच्या समर्पित कार्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली.
स्व. अजितदादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पवार कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या स्मृती महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात सदैव अजरामर राहतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages