आणि प्रणवमुळे विषारी नागाला मिळाले नवे जीवन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 30, 2026

आणि प्रणवमुळे विषारी नागाला मिळाले नवे जीवन

 आणि प्रणवमुळे विषारी नागाला मिळाले नवे जीवन




अकलूज (कटूसत्य वृत्त):- घरात किंवा घराच्या आसपास, सर्प निघाल्याचे समजताच, नागरिक भयभीत होऊन जातात.
मात्र अकलूज येथील ज्येष्ठ पत्रकार संजय लोहकरे, यांच्या घराच्या परस बागेत नाग आसल्याचे निदर्शनास आल्यानंतर, सर्प अभ्यासक प्रा.धनंजय देशमुख यांना फोन करून बोलवले होते पण ते बाहेर गावी असल्याने,खंडाळी (ता.माळशिरस) येथील युवा सर्प मित्र प्रणव इंगवले देशमुख याला फोन करताच, क्षणाचाही विलंब न लावता तो तत्काळ सर्प निघालेल्यास्थळी पोहचून, अत्यंत काळजीपूर्वक, विषारी नागाला पकडून, निसर्गाच्या स्वाधीन केले.
        अकलूज परिसरातील घराच्या अंगणात,स्वयंपाक घरात,शेत शिवारात,गोठ्यात किंवा कडे लोटाच्या भागात आढळणारे कोब्रा,मण्यार,अजगर,धामण यासारखे साप प्रा.धनंजय देशमुख आणि त्यांनी तयार केलेले ९ सर्पमित्र अत्यंत संयमाने व कौशल्याने पकडून त्यांच्या अधिवासात सोडून देतात.साप दिसताच ठार मारण्याची मानसिकता ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावर आढळून येते.मात्र या सर्व सर्प मित्रांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे ही मानसिकता हळूहळू बदलू लागली आहे.

चौकट...
नागाचा रंग काळा,तपकिरी, ऑलिव्ह हिरवा किंवा पिवळसर असू शकतो फणा काढल्यावर पाठीवर चष्म्या सारखी किंवा 'U' आकाराची खूण दिसते.आकार व आयुष्य: नागाची लांबी साधारणपणे ३ ते १० फुटां पर्यंत असू शकते. स्वभाव: नाग स्वतःहून हल्ला करत नाहीत.भीती वाटल्यास किंवा डिवचल्यास ते फणा काढून उभे राहतात.नागाचे मुख्य अन्न उंदीर, बेडूक आणि इतर लहान कीटक आहेत.प्रजनन: नाग अंडी घालतात.
      प्रा.धनंजय देशमुख.
    सर्पमित्र व सर्प अभ्यासक

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages