शहरस्तरीय मैदानी स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेत 6 पदके
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय क्रीडांगण, नेहरूनगर येथे दिनांक 16 व 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत शहरस्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते...
या स्पर्धेत एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशालेने 6 पदकांची कमाई केली...
या सर्व खेळाडूंचे नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार प्रकाशजी यलगुलवार, जनरल सेक्रेटरी के.डी. पाटील, जनरल सेक्रेटरी शशीभूषण, उपाध्यक्ष अनुगीता पवार, सहसेक्रेटरी सीमा श्रीगोंदेकर, मुख्याध्यापक डॉ.हणमंत नारायणकर यांनी अभिनंदन केले...
या यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक सुभाष माने, गणपती कोळी, खंडू शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले...
प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विद्यार्थ्यांचे बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे...
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
17 वर्षाखालील मुली -
●तिहेरी उडी
#सृष्टी विटकर - द्वितीय
●हातोडा फेक
#नेहा बेशकराव - प्रथम
# अमृता परकीपंडला - तृतीय
17 वर्षाखालील मुले
●हातोडा फेक
#ईश्वर चारगुंडी - तृतीय
19 वर्षाखालील मुली
●तिहेरी उडी
#उत्कर्षा चौगुले - द्वितीय
19 वर्षाखालील मुले
●तिहेरी उडी
# साई अष्टेकर - तृतीय

No comments:
Post a Comment