उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारा वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 19, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारा वाटप

उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार  यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारा वाटप
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांचा उपक्रम



मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):-   राज्यात सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा संकटात सापडलेला आहे. त्यातच  दिनांक १८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री  सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचा वाढदिवस असून
आदरणीय दादांच्या पश्चात आदरणीय वहिनीसाहेबांचा हा पहिलाच वाढदिवस. आज आपल्या राज्यातील बळीराजा दुष्काळाच्या संकटामध्ये सापडला आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना या कठीण काळात मदत व्हावी या उद्देशाने आदरणीय वहिनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा खर्च न करता आपापल्या भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आपल्या परीने मदत करावी असे आदरणीय वहिनीसाहेबांच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
आदरणीय दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी व राज्यावरील दुष्काळाचे संकट या पार्श्वभूमीवर आदरणीय वहिनींचा कुठेही वाढदिवसाचा  कार्यक्रम आयोजित करण्यात येवू नये, असे  विनम्र आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष श्री निखिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय सुनीता वहिनी व पार्थ दादा यांच्या आदेशाने महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी वं कार्यकर्ते मदतीसाठी हजर असेल त्यानुसार राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी या गावात आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात आला.
यावेळी मुहम्मद उस्ताद , सारंग महामुनी, प्रदीप तांदळे , बशीर शेख, हर्षवर्धन देशमुख , नासीर शेख,  आबा खांडेकर यांच्यासह आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages