सोलापुरात सोमवार १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या कंत्राटदार यांचे आंदोलनास प्रचंड मोठा पाठिंबा व उपस्थिती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 19, 2026

सोलापुरात सोमवार १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या कंत्राटदार यांचे आंदोलनास प्रचंड मोठा पाठिंबा व उपस्थिती

  सोलापुरात सोमवार १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या कंत्राटदार यांचे आंदोलनास प्रचंड मोठा पाठिंबा व उपस्थिती





संदर्भ:(कटूसत्य वृत्त):-   सोलापूर येथील निवासी उपजिल्हाधिकारी यांना या पाच संघटनेतर्फे प्रचंड घोषणा व ठिय्या आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये करून निवेदन सादर


महोदय 


सोलापूरमधील सर्व विभागांतील कंत्राटदार यांचे आज सोमवार १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पुनम गेट, जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना,सोलापुर जिल्हा लेबर फेडरेशन, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, सोलापूर महापालिका contractors असोसिएशन,तसेच हाॅट मिक्स असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले होते, सदर आंदोलनास कंत्राटदार यांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली आहे.


सदर आंदोलनातील महत्त्वाच्या मागण्या


१) राज्यातील सर्व विभागाकडील ८६ कोटींची देयके दिवाळीपूर्वी तातडीने अदा करावी.

२) ज्या ९ कंत्राटदार यांचे आत्महत्या झालेल्या आहेत त्यांच्या परीवारास भरघोस शासकीय मदत जाहीर करावी.


३) शासकीय प्रलंबित देयके काढण्याचे अगोदरच GST भरण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा.


४) नवीन बाजारात असलेली सर्व वस्तूंची भाववाढ अंदाजपत्रक मध्ये धरून अंदाजपत्रक तयार करणे व जुन्या निविदा झालेल्या व कामे झालेल्या व प्रगतीपथावर असलेल्या १ लक्ष ते २५० लक्ष पर्यतचे कामांस भाववाढ ( उदा डांबर, सिमेंट,स्टील,रंग,खडी,मुरूम सह अनेक जिन्नस) तातडीने मंजूर करून कामांची लांबी कमी करणे व इतर गोष्टीचा तातडीने वापर करणे.


५) सर्व विभागाकडील E online निविदा प्रक्रिया मध्ये  सुरू असलेला राजकीय लोकप्रतिनिधी यांचा हस्तक्षेप तातडीने बंद करून निकोप स्पर्धा कार्यान्वित करणे


६) सार्वजनिक बांधकाम २७ हजार कोटी , जलजीवन मिशन ३८हजार कोटी आदिवासी ११ हजार कोटी, पर्यटन विभाग २५०० कोटी, जलसंपदा ३५०० कोटी , ग्रामविकास विभाग ३००० कोटी , जलसंधारण २४०० कोटी, नगरविकास व इतर अनेक विभागाचे १७ हजार कोटी अशी प्रलंबित देयके आहेत 


७) राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व इतर विभागांचे मंत्री यांनी आत्महत्या, प्रलंबित देयके व कंत्राटदार यांचे मागण्या याबाबत अभ्यास समिती तातडीने स्थापन करणे.सदर आंदोलनास महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा संघटना राज्य अध्यक्ष इंजि

मिलिंद भोसले,कर्नाटक कंत्राटदार असोसिएशनचे महासचिव एच आर चिंचली,सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन अध्यक्ष शंकरराव चौगुले, सोलापूर महानगर पालिका कंत्राटदार संघटना अध्यक्ष,रामभाऊ दुधाळ , अभियंता संघटना राज्य विभागीय अध्यक्ष कांतीलाल दूबल, पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना कार्याध्यक्ष आनंद तोडकरी, सचिव कैलास लांडे,संघटक नरेद्र भोसले,सोमनाथ दावणे, विनोद क्षीरसागर,

 विनोद चव्हाण, सूर्यकांत बिराजदार, संजय देशपांडे, मनोहर शिराळ, गोविंदअनागुंडे,  प्रमोद कुलाल, हनुमंत तरंगे बाळासाहेब वाघमोडे, बाळासाहेब मोटे, दिनेश झांबरे, सचिन जाधव संतोष लाबगुंडे, विजय मुलगे, विनोद चव्हाण विवेकानंद तरंगे, अण्णाराव पाटील, गणेश भालेराव, महेश जाधव, शंचंद्रकांत अवताडे, शशिकांत शिंदे,गणपत मस्के, पोपट शेंबडे, राजकुमार खुर्द, मधुकर चवरे, अभिजीत गायकवाड, पी बी माने, अजित साठे, शेखर शिवशरण, शरणाप्पा शिरूर, श्रीकांत सोनी, प्रफुल्ल शिंदे, प्रतिक मशाले, बी वी राठोड, सचिन गुंड, सचिन शिंदे, निशांत मंजेली, हैबतराव देशमुख, महादेव सरगर, शिवानंद पाटील,शांतप्पा ढंगापुरे, अविनाश चेळेकर,संजय डांगे सह २०० चे आसपास विकास  व कंत्राटदार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages