शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 30, 2026

शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

 शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा



 

अकलूज (कटूसत्य वृत्त):- 26 जानेवारी 2026 रोजी, शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये, भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन सोहळा शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर सुभेदार  विजयकुमार महादेव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध असे संचलन आणि देशभक्तीपर गीताच्या तालावर सुंदर अशी कवायत सादर केली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांची निवड प्रशालेतील शिक्षिका सौ. तमन्ना नाईकवाडी यांनी केली तर त्यास अनुमोदन सौ. ज्योती घोडे यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र माने देशमुख यांनी केले त्यानंतर पाहुण्यांचा स्वागत-सत्कार मुख्याध्यापकांच्या हस्ते पार पडला. मंचावर ज्येष्ठ एल.एम.सी मेंबर एच.डी भोसले सर, शंकर गायकवाड, सौ.वनिता कोरटकर, माता -पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ.सुषमा शिंदे आणि मेजर चेतन गवळी सपत्नीक उपस्थित होते.
तदनंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली आणि विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर प्रशालेतील शिक्षिका सौ अनिता गायकवाड यांचे भाषण झाले.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लेझीम आणि देशभक्तीपर गीतावर नृत्यांचे सादरीकरण झाले तसेच स्कूलमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभेदार विजयकुमार महादेव सावंत यांनी  विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत करून विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या विविध कला प्रकारांच्या सादरीकरणाचे कौतुक करत स्कूलमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली आणि शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन एक नवीन दिशा निर्माण करून दिली. तसेच पुढील वर्षी शाळेमध्ये अकॅडमी चालू करण्याविषयी आश्वासन दिले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ शिल्पा जाधव यांनी तर आभार गणेश शेवकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages