Hot Posts

6/recent/ticker-posts

नई जिंदगी नागरी आरोग्य केंद्रात नवविवाहित जोडप्यांसाठी आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम

 नई जिंदगी नागरी आरोग्य केंद्रात नवविवाहित जोडप्यांसाठी आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हॅलो मेडिकल फाउंडेशन व आलईव्हस लाईफ सायन्सेस लिमिटेड अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या संपूर्ण प्रकल्पाच्या वतीने तसेच नई जिंदगी नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत नवविवाहित जोडप्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम मंगळवार,२७ जानेवारी २०२६ रोजी नई जिंदगी नागरी आरोग्य केंद्रात उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात प्रकल्प समन्वयक जावेद यांनी प्रस्तावना करून केली. त्यानंतर उपस्थित नवविवाहित जोडप्यांचे एकमेकांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

                                         

यावेळी डॉ. समन तांबोळी यांनी नवविवाहित दांपत्यांनी विवाहानंतर पहिल्या टप्प्यात कसे वागावे, एकमेकांना समजून घेण्याचे महत्त्व, परस्पर काळजी घेणे, तसेच पहिल्या अपत्यापर्यंत कोणती आरोग्यविषयक काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मासिक पाळीबाबत समाजात व कुटुंबात असलेल्या गैरसमजांवर प्रकाश टाकत, सासू–सुनेमधील संवाद कसा सकारात्मक असावा यावरही त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. घरातील वातावरण आनंदी व तणावमुक्त ठेवले तर गर्भवती मातेला कोणताही शारीरिक किंवा मानसिक त्रास होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

नई जिंदगी नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गीता गावडे यांनी महिलांचे व कुटुंबाचे आरोग्य, मातृत्व सेवा तसेच केंद्रात उपलब्ध असलेल्या विविध आरोग्य सुविधांची माहिती उपस्थितांना दिली. नियमित तपासणीचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

यावेळी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. अस्मिता बालगावकर यांनी गर्भधारणेदरम्यान मातांचे मानसिक आरोग्य कसे जपावे, तणावमुक्त जीवनशैलीचे महत्त्व, तसेच आहार कसा व कोणत्या वेळेत घ्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास २९ नवविवाहित दांपत्यांपैकी १४ नवविवाहित जोडपी, २१ नववधू व त्यांच्या सासू**, असे एकूण ५६ जण उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रकल्प समन्वयक जावेद यांनी केला. शेवटी सर्व उपस्थितांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कविता बनसोडे यांच्यासह संपूर्ण टीमने विशेष सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले.


Reactions

Post a Comment

0 Comments