Hot Posts

6/recent/ticker-posts

पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या भेटीला प्रथमेश कोठे

 पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या भेटीला प्रथमेश कोठे



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माजी महापौर महेश कोठे यांचे पुत्र तथा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र पक्षातील काही लोक निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहेत. या अंतर्गत राजकारणातून प्रथमेश कोठे यांना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून मुंबई भेटीचा निरोप आला. या भेटीवेळी कोठे यांच्यासह काही युवा पदाधिकारी उपस्थित होते. आता शरद पवार गटातील इतर पदाधिकाऱ्यांची या भेटीवर काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष आहे.


दरम्यान, प्रथमेश कोठे हे भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांचे चुलत बंधू आहेत. आमदार कोठे गटाकडून प्रथमेश यांना भाजपसोबत येण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे. प्रथमेश यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.


Reactions

Post a Comment

0 Comments