ग्रंथपालन परीक्षेचा निकाल जाहीर, कविता माने सोलापूर केंद्रात प्रथम
सोलापूर जिल्ह्याचा निकाल ५२ टक्के लागला
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेत ७०० पैकी ४३९ गुण मिळवून कविता नागेश माने प्रथम,४११ गुण मिळवून मुश्रीफ शेख द्वितीय, ४१० गुण मिळवून प्रतिभा हरिश्चंद्र पिंगळे तृतीय आली आहे.
महाराष्ट्र राज्यातून १४६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी ८४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सोलापूर केंद्रातून ७९ विद्यार्थ्यांपैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ५२ टक्के निकाल लागला. जानेवारी २०२५ ते जून २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात २४ जिल्ह्यांत हा वर्ग चालविला होता. जून अखेरीस परीक्षा झाल्या होत्या. कविता माने, मुश्रीफ शेख यांचा सत्कार गुणपत्रक, ग्रंथभेट आणि बुके देऊन वर्गव्यवस्थापक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, लिपिक सारिका माडीकर, सेवक गीतांजली गंभिरे, देगाव सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल राजश्री माशाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वर्गाचे मुख्याध्यापक अविनाश गायकवाड, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र विजयकुमार पवार, उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, कार्यवाह साहेबराव शिंदे, वर्गशिक्षक गणेश फंड, दत्ता मोरे, विनोद गायकवाड वृषाली हजारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
0 Comments