जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६च्या तयारीचा आढावा
बार्शी (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दि. १३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्यानंतर त्यानुषंगाने निवडणूक तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज दि. १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात (तहसील कार्यालय, बार्शी) सर्व नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकारी व त्यांच्या सहाय्यकांना त्यांच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. निवडणूक प्रक्रियेतील नियोजन, समन्वय, वेळापत्रक तसेच कायदेशीर व प्रशासकीय बाबींवर भर देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
निवडणुका शांततेत, पारदर्शक व नियमानुसार पार पडाव्यात यासाठी सर्व नोडल अधिकारी यांनी जबाबदारीने कार्य करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
बैठकीस सर्व नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.
.png)
0 Comments