उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजयराज डोंगरे यांना मिळाला 'दादाचा वादा'
'लोकशक्ती' परिवाराचे शेकडो कार्यकर्ते 'राष्ट्रवादी'त दाखलकुरुल (कटूसत्य वृत्त):- तब्बल दीड दशक राष्ट्रवादीचं शिवाळ खांद्यावर घेऊन जिल्ह्याची मशागत करून जिल्हाभर 'घड्याळ' बहरून आणलेले ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे यांचे चिरंजीव सोलापूर जि.प. अर्थ बांधकाम माजी सभापती विजयराज डोंगरे यांच्यासह त्यांचा बलाढ्य असणारा लोकशक्ती परिवार यांनी 'राष्ट्रवादी पुन्हा' चा नारा दिल्यानंतर आज प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बारामती येथे अधिकृतपणे जाहीर प्रवेश केला असून महाराष्ट्राचे हेवीवेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 'दादाचा वादा' डोंगरे गटाला मिळाला असल्याने लोकशक्ती परिवारात नवचैतन्य पसरले आहे.
सोलापूर जिल्हा हा कधी काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. चार - दोन मतदारसंघ वगळता जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे यांनी अविरथपणे चालू ठेवली होती. जास्तीचा काळ जिल्हाध्यक्ष पदावरती असल्याने मनोहर डोंगरे यांनी जबाबदारीचं शिवाळं खांद्यावरून खाली उतरलं आणि सुरू झाली पक्षाची वाताहात. मध्यंतरी तर चांगलाच पडझडीचा खडतर प्रवास राष्ट्रवादीला करावा लागला. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पानिपत झाले. मात्र सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची पुनर्बांधणी करायची हा विचार ठेवून न खचता, न थांबता ना.अजित पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील अंतर्गत मतभेदामुळे राष्ट्रवादीला सोडून गेलेले आणि राष्ट्रवादीवर व पवार कुटुंबीयांवर कायम निष्ठा असणारे डोंगरे पिता-पुत्रांच्या खांद्यावर पुन्हा एकदा घड्याळाचे उपरणं टाकून स्वग्रही स्वागत केलं आहे.
ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे, माजी सभापती विजयराज डोंगरे यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी आज राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बारामती येथे पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विजयराज दादा यांना अजित दादांकडून कोणता शब्द मिळणार...? होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत किती बळ मिळणार...? राष्ट्रवादीकडून कोणती ताकद मिळणार...? याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
डोंगरे यांच्यामुळे 'राष्ट्रवादी' वाढणार- राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर गत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये विजयराज डोंगरे यांनी जिल्हा परिषदेच्या ३ तर पंचायत समितीच्या ६ जागांवर वर्चस्व सिद्ध केले होते. पुढे जाऊन सलग ५ वर्ष जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे विजयराज डोंगरे यांनी राष्ट्रवादी पुन्हा चा नारा दिल्यानंतर मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढणार असल्याचे भाकित व्यक्त केले जात आहे.
.png)
0 Comments