Hot Posts

6/recent/ticker-posts

११८ ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी सभा, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

 ११८ ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी सभा, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग




शिरवळ येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ
अक्कलकोट (कटुसत्य वृत्त) – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठीची भव्य योजना आहे. या अभियानात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्यास शिरवळसह अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गाव सुशासनाचे आदर्श मॉडेल ठरेल, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बुधवारी केले.
शिरवळ ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ व ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री  जयकुमार गोरे  यांनी ऑनलाइन संवाद साधून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले की, या अभियानातून गावोगावी विकासाची चळवळ उभी राहील. पारदर्शक प्रशासन व सुशासन प्रस्थापित करणे हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, तहसीलदार विनायक मगर, गटविकास अधिकारी शंकर कवितके, माजी जि. प. सदस्य आनंद तानवडे, सरपंच आशादेवी बिराजदार, उपसरपंच पूजा कवडे, ग्रामविकास अधिकारी अभय नेलुरे, आप्पासाहेब बिराजदार, बसवराज तानवडे, आप्पू देवकर, राजू जवळगे, संगप्पा चानकोटे, अजित व्हदलुरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील तब्बल ११८ ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी सभा घेण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी स्क्रीनद्वारे मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांचा ऑनलाइन संवाद दाखवण्यात आला. दहिटणे येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंच नितीन मोरे, विकी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामविकास विभाग शाश्वत विकासासाठी ठिबक सिंचन, शेततळी, बंधारे, जलसंवर्धन, जलयुक्त शिवार, सेंद्रिय शेती, महिला बचत गट, आवास योजना, दुग्धोत्पादन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन अशा विविध योजनांचा प्रभावी अंमल करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.


Reactions

Post a Comment

0 Comments