Hot Posts

6/recent/ticker-posts

कामती गटातील कार्यकर्ते म्हणताहेत;

 कामती गटातील कार्यकर्ते म्हणताहेत; 
 'तानाजीअण्णाच्या माघारी आता आपली जबाबदारी'


▪️ विमल ताई खताळ यांनी प्रचारात घेतली भरारी 

 कुरुल (कटूसत्य वृत्त):- 

 होऊ घातलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चांगलाच रंग भरला असून कामती जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार विमलताई तानाजीराजे खताळ यांनी घरभेट व गावभेट दौऱ्यासह मतदारसंघ पिंजून काढला असून संपूर्ण खताळ कुटुंबीय मतदारांच्या गाठीभेटीकडे लक्ष देत आहे.

 दरम्यान गतवेळेस झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत याच मतदारसंघातून स्व. तानाजी राजे खताळ यांनी निवडणूक लढवली होती. मतदार संघातील जनतेने स्व. तानाजीराजे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते. मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी शासकीय योजनेतून अथवा स्वखर्चाने अनेक लोकाभिमुख कामे केली होती. मतदार संघातील गावागावात त्यांचा कार्यकर्ता भरभक्कम उभा होता. मात्र कोरोना काळात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. 

 आज याच मतदारसंघातून  स्व.

तानाजीराजे खताळ यांच्या पत्नी विमलताई खताळ या नशीब आजमावत आहेत. कामती मतदार संघातील असणाऱ्या सर्वच गावात खताळ परिवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. विमलताई खताळ यांच्या सासुबाई स्व. रुक्मिणी खताळ यांना मानणारा ज्येष्ठ वर्ग देखील या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रचार करत असताना विमलताई खताळ यांच्यासह त्यांचे चिरंजीव युवा नेते अक्षय खताळ, रुद्राक्ष खताळ, अनिरुद्ध खताळ, संग्राम खताळ यांच्यासह सर्व सुना ज्यावेळी प्रचार करण्यासाठी बाहेर येतात त्यावेळी कार्यकर्ते स्वतःहून म्हणत आहेत ही एकट्या खताळ परिवाराची निवडणूक नसून सर्वांची आहे त्यामुळे स्वर्गीय तानाजी अण्णांच्या माघारी ही सर्व आपली जबाबदारी असल्याचे मत नागरिकांतून बोलले जात असून हीच हॅशटॅग वापरली जात आहेत.

▪️चौकट

जनतेची पक्षाबद्दल चांगलीच प्रतिक्रिया

- गेली महिना झालं कामती गटाच्या प्रत्येक भागात आम्ही प्रचाराच्या निमित्ताने फिरतो आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याचा शाश्वत विकास केला आहे. तालुक्याचे भाग्यविधाते राजन पाटील यांनी मोहोळ तालुक्यात विकासाची गंगा आणले आहे, त्यामुळे दोन्ही विकासप्रिय नेतृत्व एका ठिकाणी झाल्याने पुन्हा एकदा विकासासाठी भारतीय जनता पार्टी हाच एकमेव पर्याय आहे. केंद्र सरकारने व राज्य सरकारने सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजना पाहता आम्ही नक्कीच आघाडी घेऊ. 

- विमलताई खताळ

उमेदवार कामती जि.प.गट

Reactions

Post a Comment

0 Comments