कांद्याच्या वाढलेल्या आवकामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि हतबलपणा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी तब्बल ८३६ ट्रक कांद्याची आवक झाली. यामुळे मार्केट यार्ड परिसरात यावेळी दिवसभर व रात्रीही बाहतूक खोळबंली होती.
आवक वाढल्याने कांद्याचे दरही कोसळल्याने शेतक-यांतून नाराजी व्यक्त होत आहे.यंदाच्या हंगामातील ही सर्वाधिक आवक ठरली आहे. त्यामुळे बाजार समिती परिसरात कांदा घेऊन आलेल्या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तर आवक अधिक असल्याने बाजार समितीमध्ये कांदा उत्तरविण्यास वेळ लागला.त्यामुळे लिलाव प्रक्रियेला ही उशीर झाला.
यंदाच्या हंगामातील नवा कांदा सध्या बाजारात यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवकसातत्याने वाढत चालली आहे. त्यामुळे लिलाव उशिराने सुरू झाली होती. त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. बाजार समितीत चांगल्या प्रतिच्या कांद्याला प्रति क्विंटल २२०० तर सर्वसाधारण कांद्यालाकिमान ९०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. काद्यांच्या दरात गेल्या महिनाभरात तब्बल दोन ते अडीच हजाराने घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च ही निघत नसल्याने शेतकयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शनिवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल ८३६ ट्रकमधून सुमारे ८३ हजार ६३३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यामधून तब्बल ७ कोटी ५२ लाख ६९ हजार रुपयांची उलाढाल कांदा बाजारात झाली होती.
रविवारी शासकीय सुट्टी आणि सोमवारी प्रजासताक दिनाची सुट्टी आल्याने शनिवारी कांद्याची मोठी आवक झाली होती. त्यामुळे कांदा घेऊन आलेल्या वाहनाच्या रांगा बाजार समितीच्या बाहेर ही लागल्या होत्या. अशी माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली.

0 Comments