अजित पवार यांच्या निधनाने माढा तालुक्यात शोककळा
माढा (कटूसत्य वृत्त):-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने माढा तालुक्यात तीव्र शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर माढा शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. नागरिकांमध्ये शोकभावना दिसून येत होती.
माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रद्धांजली कार्यक्रमास माजी आमदार धनाजीराव साठे, प्रा. शिवाजीराव सावंत, नगराध्यक्ष मीनलताई साठे, उपनगराध्यक्ष कल्पना जगदाळे, दादासाहेब साठे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे, माजी पंचायत समिती सदस्य पृथ्वीराज सावंत, ऋतुराज सावंत, संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे, नगरसेवक अजिनाथ माळी, नाना साठे, माजी नगराध्यक्ष गंगाराम पवार, राहुल लंकेश्वर, शिवसेनेचे भैया खरात, वंचित बहुजन आघाडीचे रवी सरवदे, शिवसेना (उबाठा)चे संतोष जुगदार, दादा भांगे, मुन्ना साठे, शहाजी चवरे, महेश चवरे, नगरसेवक राजू गोटे, आदित्य भांगे, समर्थ भांगे, रणदिवेवाडीचे माजी सरपंच दिगंबर इंगळे, बाबा मस्के, शंभूराजे साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना माजी आमदार धनाजीराव साठे आणि नगराध्यक्ष मीनलताई साठे यांचा कंठ दाटून आला होता.
दरम्यान, प्रा. शिवाजीराव सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, भैरवनाथ शुगर सोनारी या कारखान्याच्या उभारणीत अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली होती. पक्षभेद विसरून अजित पवार नेहमी आपुलकीने वागले. त्यांच्या निधनाने घरातील व्यक्ती गेल्याचे दुःख होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांच्या निधनाने माढा तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत असून सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.
.png)
0 Comments