Hot Posts

6/recent/ticker-posts

पोखरापूर गण व गटात सर्वसामान्यांचे नेतृत्व पुढे

 पोखरापूर गण व गटात सर्वसामान्यांचे नेतृत्व पुढे
पंचायत समिती गण ५२ मधून समाधान खंदारे, जिल्हा परिषद गट २६ मधून सर्जेराव निळे अधिकृत उमेदवार
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- “सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सर्वसामान्य माणसालाच समजतात,” या भूमिकेतून सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले, हुशार, अभ्यासू आणि निस्वार्थी व्यक्तिमत्त्व असलेले समाधान मारुती (मेंबर) खंदारे यांची पंचायत समिती पोखरापूर गण क्रमांक ५२ मधून अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषद पोखरापूर गट क्रमांक २६ मधून सर्जेराव नाना निळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा होताच पोखरापूर परिसरात कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाधान खंदारे हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले असून, गावातील पाणीप्रश्न, रस्ते, शिक्षण, आरोग्य, शेतकरी व युवकांचे प्रश्न याबाबत त्यांचा सखोल अभ्यास आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव आहे. त्यामुळे पंचायत समिती गण ५२ मधील जनतेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
जिल्हा परिषद गट २६ मधील उमेदवार सर्जेराव नाना निळे हेही जनसामान्यांशी थेट नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गावविकास, शेतीपूरक सुविधा, पाणीपुरवठा, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक सलोखा या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडली असून, विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांना विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे.
यावेळी बोलताना दोन्ही उमेदवारांनी सांगितले की, “जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. सर्वसामान्य माणसाचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू.” गावागावातील मूलभूत सुविधांचा समतोल विकास, पारदर्शक कारभार आणि जनतेशी सातत्याने संवाद ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाधान खंदारे आणि सर्जेराव निळे यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, पोखरापूर गण व गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना मोठा जनाधार मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments