Hot Posts

6/recent/ticker-posts

एन. के. किड्स स्कूल आता सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली

 एन. के. किड्स स्कूल आता सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली
सचिन पिसके व शुभांगी पिसके यांच्याकडून स्कूलला सीसीटीव्ही कॅमेरा भेट
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-दि. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून : बाळे राजेश्वरी नगर येथील एन. के. किड्स स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. एल.के.जी. वर्गाचे पालक सचिन पिसके व शुभांगी पिसके यांनी शाळेला अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याने आता संपूर्ण शाळा परिसर सीसीटीव्हीच्या सतत देखरेखीखाली राहणार आहे.
हा सीसीटीव्ही संच सौरऊर्जेवर चालणारा असून त्यामध्ये उच्च दर्जाचे तीन डिजिटल कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे शाळा परिसरातील सर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून कोणत्याही अनुचित अथवा संशयास्पद प्रकारांना आळा बसणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही सुरक्षिततेचा मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रसंगी खंडोबा देवस्थानचे चेअरमन विनय ढेपे, राजाभाऊ आलुरे, विकास कस्तुरे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे, दिपाली कुलकर्णी, अश्विनी शिंगण, पुनम कळसाईत, सेविका संगीता हेगडकर यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या वतीने या सामाजिक उपक्रमाबद्दल सचिन पिसके व शुभांगी पिसके यांचे मनापासून आभार मानण्यात आले. पालकांच्या सहकार्यामुळे शाळेत सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यास बळ मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
Reactions

Post a Comment

0 Comments