Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ व हुतात्मा सार्वजनिक वाचनालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ व हुतात्मा सार्वजनिक वाचनालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर आणि हुतात्मा सार्वजनिक वाचनालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीअॅड. खतीब वकील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे संचालक तेजू चव्हाण, हुतात्मा सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, प्रा. प्रथमेश बनसोडे, ग्रंथपाल सौ. वृषाली हजारे तसेच सेवक गीतांजली गंभीरे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगत संविधानाचे मूल्य, लोकशाहीची जबाबदारी आणि वाचनसंस्कृतीचे समाजातील स्थान यावर मार्गदर्शन केले. ग्रंथालय चळवळ समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून तरुण पिढीने वाचनाची आवड जोपासावी, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित नागरिक, वाचक, ग्रंथप्रेमी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला.
Reactions

Post a Comment

0 Comments