राष्ट्रवादी भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
संविधान वाचन, राष्ट्रगीत व तिरंगा सलामीने देशभक्तीचे वातावरण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरातील राष्ट्रवादी भवन कार्यालय येथे भव्य व शिस्तबद्ध ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी मकबूल मोहोळकर यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
ध्वजारोहणानंतर राष्ट्राचे प्रतीक असलेल्या तिरंगा ध्वजास उपस्थितांनी सलामी दिली. यावेळी सामूहिक संविधान वाचन करण्यात आले. भारतीय संविधानाने दिलेले हक्क, कर्तव्ये व लोकशाही मूल्यांचे स्मरण करून देत प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताच्या गजरात संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
या कार्यक्रमास परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, अनिल उकरंडे, प्रा. श्रीनिवास कोंडी, अजित बनसोडे, युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख, VJNT सेल अध्यक्ष रुपेश कुमार भोसले, सहकार सेल अध्य्यक्ष भास्कर आडकी, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, विधी सेल अध्यक्ष ॲड. जयप्रकाश भंडारे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, OBC सेल कार्याध्यक्ष आयुब शेख, कामगार संघटना सेल अध्यक्ष मार्तंड शिंगारे, कार्याध्यक्ष संजय सांगळे, शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष प्रकाश झाडबुके, अकील पठाण, प्रज्ञासागर गायकवाड, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर, विश्वनाथ वाघमारे, म. जिना शेख, महिपती पवार, रोहित माने, मोहम्मद पटेल, मनुराज झाडबुके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानाचे रक्षण, लोकशाही मूल्यांची जोपासना व सामाजिक एकतेचा संदेश देत हा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला...
0 Comments