संभाजीराव शिंदे विद्या मंदिर विडी घरकुल, येथे देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्था अध्यक्ष मा.डॉ. सुर्यप्रकाश कोठे, संस्था सदस्या डॉ.सौ राधिकाताई चिलका, मार्गदर्शक श्री वासूदेव ईप्पलपल्ली ,मार्गदर्शीका श्रीमती तनूजा मारपल्ली हे लाभले. तसेच प्रशालेचे प्रभारी मुख्यध्यापक मा. श्री. सतीश मल्लाव, ज्यू कॉलेजचे प्रमुख प्रा. श्री. नवनाथ व्हटकर, प्राथमिक विभागच्या प्रमुख श्रीमती सविता बरबडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीतांनी ध्वजाला मान वंदना देण्यात आली. तसेच साहित्य कवायत, संगीत कवायत, स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे संचलनाने पाहुण्यांना मानवंदना देण्यात आले.
या शुभ प्रसंगी इयता ११ वी च्या विद्याथीनीनी प्रदूषण या विषयावर सुंदर नाटोका सादर केली. त्याच बरोबर इयत्ता बालवाडी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शहिदांना आदरांजली वाहिली.
आजच्या कार्यक्रमाला लाभालेले अध्यक्ष मा.डॉ. सूर्यप्रकाश कोठेसाहेब, यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मौलोक असे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आई-वडील, शिक्षक, शाळा यांचा आदर करा. देशाच्या नैसर्गिक संपतीचे जतन करा असे सांगितले, त्याच बरोबर व्यवसायीक शिक्षणावर भर देण्यास सांगितले. नागरीकशास्व व अर्थशास्त्र विषयांचा आपल्या आचरणात अणावयाचे अहवान केले.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली, शेवटी विद्याच्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री दत्तात्रय नरोटे सर यांनी केले. तर आभार सौ. गीता गोटीपामूल मॅडम यांनी मानले.

.jpeg)
0 Comments