Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रजासत्ताक दिन साजरा!

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रजासत्ताक दिन साजरा!


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्याला प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, परीक्षा संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांच्यासह विविध प्राधिकरणाचे सदस्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कुलगुरू प्रा. महानवर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विकासासाठी सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक असून ते मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या या विद्यापीठासाठी सर्वांच्या सहकार्याने पुढे घेऊन जाऊ, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Reactions

Post a Comment

0 Comments