राजकुमार हिवरकर पाटील यांच्याकडे मोहोळ विधानसभा क्षेत्र निवडणूक संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- शिंदे गट शिवसेना ओबीसी चे सोलापूर जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांची जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीची मोहोळ विधानसभा क्षेत्र निवडणूक संपर्कप्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आले आहे.शिवसेना उपनेते माजी आमदार संजय कदम यांनी ही निवड केली असून राजकुमार हिवरकर पाटील यांना संपर्क पदाच्या निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी राजकुमार हिवरकर पाटील बोलत असताना म्हणाले की माझ्यावर संपर्क पदाची टाकण्यात आलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडून जिल्हा परिषद,पंचायत समिती उमेदवारांना मार्गदर्शन करुन निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवारांचा प्रचार यंत्रणा व्यवस्थित पार पाडून शिवसेना पक्ष,संघटना वाढविण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचे आश्वासन राजकुमारी वर्कर पाटील यांनी दिले.यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार संजय कदम, अण्णा कदम स शिवसेना तसेच युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नेते मंडळी व पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments