महापालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सुभाष उद्यान पाच्छा पेठ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सोलपूर महानगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त व शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथील मा आयुक्त यांच्या कार्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस व शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी गटनेते चेतन नरोटे,विभागीय अधिकारी गायधनकर कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजित कुमार खानसुळे, श्रीगणेश बिराजदार, विजय पुकळे, शंकर माने सिद्धू तिमीगार, अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments