पेनुर जिल्हा परिषद गट.
दशरथ रणदिवे
अंकोली (कटूसत्य वृत्त) :-(दशरथ रणदिवे): मोहोळ तालुक्यातील हाय व्होल्टेज लढत होत असलेल्या पेनुर जिल्हा परिषद गटात भाजपकडून रामदासभाई चवरे तर शिंदे शिवसेना पक्षाकडून चरणराज चवरे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून शेतकरी संघटनेचे प्रभाकर उर्फ भैय्यासाहेब देशमुख यांनी उमेदवारी मिळविली आहे.
पेनुर जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्याकडून उमेदवारी मिळवण्यात रामदासभाई चवरे यांनी बाजी मारली आहे. ते मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात.तर शिवसेना शिंदे गटाचे चरणराज चवरे हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विद्यमान आमदार राजू खरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर उर्फ भैय्यासाहेब देशमुख यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी घेतली आहे. या तीनही वजनदार उमेदवारांनी निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच तयारीला लागले होते. यामध्ये भाजपाचे रामदासभाई चवरे व शिवसेना शिंदे गटाचे चरणराज चवरे आघाडीवर आहेत. या दोघांनीही आपली उमेदवारी पक्की समजून त्यांनी प्रचार देखील सुरू केला होता. दोघांचाही वैयक्तिक भेटी गाठी वर भर आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटात माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने असताना अनेक प्रकारची विकासाची कामे या मतदारसंघात केले आहेत. याचा फायदा निश्चितच रामदास भाई चवरे यांना होणार आहे. तर नव्याने निवडून आलेले विद्यमान आमदार राजू खरे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या मतदारसंघात केलेली विकास कामे लक्षात घेता चरण चवरे यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे या गटात भाजपा विरोधात शिवसेना शिंदे पक्षांमध्ये अटीतटीची लढत आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या जिल्हा परिषद गटाकडे लागून राहिले आहे.



0 Comments