Hot Posts

6/recent/ticker-posts

विमलताई खताळ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा सावळेश्वर गणाचा निर्धार

विमलताई खताळ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा सावळेश्वर गणाचा निर्धार

 लांबोटी येथे भाजपा ची बैठक संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त ):-  स्व. तानाजीराजे खताळ यांनी कामती जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व करताना या गटातील पायाभूत मूलभूत सुविधांबरोबर, आरोग्य ,शिक्षण, वीज, रस्ते , पाणी अशा विविध योजनांची कामे केली आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांच्या पत्नी विमलताई तानाजीराजे खताळ यांना कामती जिल्हा परिषद गटातून पालकमंत्री जयकुमार गोरे, आपले कुटुंबप्रमुख राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण युवानेते बाळराजे पाटील, अजिंक्यांराणा पाटील यांनी मोठी संधी दिली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कमळ आपल्या कामती गटात मोठ्या मताधिक्याने फुलवायचे असल्याने सावळेश्वर गणातून त्यांना सर्वाधिक मताधिक्य दिलेच पाहिजे असा निर्धार सावळेश्वर गणातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी करून जोशाने कामाला लागलेच पाहिजे असे आवाहन जिल्हा दूध संघाचे माजी संचालक सज्जन पाटील यांनी केले. 
लांबोटी (ता. मोहोळ ) येथे कामती गटातील सावळेश्वर गणातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ तालुक्यामध्ये केलेला मोठा विकास त्या विकासाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीच्या ताकतीने या गटातील उर्वरित विकास करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून विमलताई खताळ यांना विजयी करा. त्यांचा विजय हीच स्व. तानाजीराजे यांना खरी श्रद्धांजली असेल असेही ते शेवटी म्हणाले.
Uploading: 1287097 of 1287097 bytes uploaded.

या वेळी मोहोळ तालुका कृउबा समितीचे सभापती धनाजी गावडे, लोकनेते शुगरचे संचालक शुक्राचार्य हावळे, युवा नेते अक्षय खताळ, भीमराव चंदनशिवे, नामदेव गोफणे, प्रदीप आमले, सरपंच सुनील मिरजे,अनिरुद्ध खताळ, धर्मा शिंदे, प्रभाकर होनमाने, बाळासाहेब बंडगर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
चौकट 
कामती जिल्हा परिषद गटामध्ये सार्वजनिक जीवनात काम करीत असताना स्व. तानाजीराजे खताळ यांनी नेहमीच सामाजिक सलखा जपलेला आहे. आमचे सर्वेसर्वा माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील व सिनेट सदस्य अजिंक्यराण पाटील यांनी मोहोळ तालुक्यामध्ये युवकांची एक मजबूत फळी निर्माण केली आहे. त्या युवकांच्या ताकदीवर आपण विमलताई तानाजीराजे खताळ यांना सावळेश्वर या गणातून मोठे मताधिक्य दिले जाईल.
Reactions

Post a Comment

0 Comments