Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन आज पहाटे १ ते ६; विशेष अलंकारात पूजा

 श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन आज पहाटे १ ते ६; विशेष अलंकारात पूजा




तुळजापूर (कटूसत्य वृत्त):- नव वर्षातील पहिला सण मकर संक्रांत दिवशी श्री तुळजाभवानी मंदिर मध्यरात्री १ वाजता उघडले जाणार आहे. उघडल्यानंतर भक्तांना मातेचे चरणतीर्थ पार करण्याची संधी मिळेल आणि मातेच्या नित्य पूजेची घाट सकाळी सहा वाजता दिली जाईल. बुधवारी पहाटे १ ते ६ या वेळेत भाविकांना मातेचे मुख व धर्म दर्शन घेता येणार आहे.
मकर संक्रांत हा महिलांचा सण असल्यामुळे स्थानिक महिलांना मंदिरात थेट प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी महिलांनी आधारकार्ड दाखवणे आवश्यक आहे. शहर व जिल्ह्यातील अनेक महिला या दिवशी आईच्या दरबारात येऊन अखंड सौभाग्यासाठी वाणवसा करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी मातेला साकडे घालतात.
या दिवशी श्री तुळजाभवानी मातेला रत्नजडीत अलंकार आणि विविध प्रकारचे दागदागिने, तसेच साखरेच्या हलव्याचे दागिनेही परिधान केले जातात. या विशेष अभूषणामुळे मातेची मूर्ती अधिक शोभून दिसते. मंदिरात दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी अपेक्षित आहे.
याच दिवशी पुरुषांना मंदिरात प्रवेशावर एक तासासाठी बंदी असेल. मकर संक्रांतीच्या निमित्ताने बुधवारी सायंकाळी ५ ते ६ वाजेप
Reactions

Post a Comment

0 Comments